top of page

स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांची नातं विदुला यांचे दुर्मिळ छायाचित्र

#उपयुक्त_धार्मिक_रूढींवर_तात्यांची_डोळस_श्रद्धा


तात्यांच्या तरुणपणातील काही आठवणी, कविता,वा लेख पाहिले की हे देवावर श्रद्धा ठेवणारे असावेत असे वाटे, तर, रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात धार्मिक रूढी व समजुतींवर त्यांनी केलेली प्रखर टीका यामुळे ते देवाचे अस्तित्व अमान्य करणारे पुरोगामी विचारसरणीचे वाटत. परंतु तात्यांच्या अशा दोन घरगुती आठवणी सांगता येतील की, त्यामुळे तात्या हे आस्तिक आहेत की नास्तिक, याचा संभ्रम पडावा.

तात्यांची नात (माझी मुलगी) चि. विदुला पाच वर्षांची झाली आणि तिला शाळेत घालण्याची वेळ आली. त्यासाठी जवळच असलेल्या श्री प्रकाश मोहाडीकरांच्या ‘बालोद्यान' या पूर्वप्राथमिक शाळेत नाव घालण्यासाठी त्यांना जाऊन मी भेटलो. ते दिवस नवरात्र उत्सवाचे होते. तात्यांची इच्छा की, विदुलाला दसऱ्यापासूनच शाळेत पाठवावे. त्याप्रमाणे मी मोहाडीकरांना विनंती केली. परंतु त्यांनी व्यवहारी समादेश दिला की, आतापावेतो सहा महिने होतील, त्यामुळे सबंध वर्षाची फी भरावी लागेल, आणि आधीचा सहा महिन्यांचा अभ्यास झालेला असल्याने तिचे हे वर्ष वाया जाण्याचा संभव आहे. म्हणून पुढील वर्षाच्या आरंभापासूनच विदुलाचे नाव नोंदवावे. परंतु पारंपरिक पद्धतीने दसऱ्यापासून शाळेत धाडण्याचा शुभारंभ कारावा, असे तात्यांचे म्हणणे असल्याने वरील धोका पत्करूनही विदुलाला दसऱ्याच्या शुभदिनी शाळेत पाठविले. तसेच दसऱ्याला विदुलाला पाटीवर शालेय पद्धतीची सरस्वतीच्या आकृतीची पूजा करण्यास त्यांनी विरोध केला नाही. मात्र पाटीपूजेच्या शास्त्राप्रमाणे शस्त्रपूजाही करावी असा त्यांचा कटाक्ष असे. त्याप्रमाणे घरातील जंबिया, गुप्ती या शस्त्रांची पूजासुद्धा घरात होत असे.

दसरी अशीच आठवण : चि. विदुला ९/१० वर्षाची असताना तिला इतरांप्रमाणे आपल्या घरीही हौसेने गणपती आणावा असे वाटे. त्याप्रमाणे घरी गणपती आणून त्याची पूजा विदुला करी. कै. माई तिला पूजेची, प्रसादाची सिद्धता करून देई. तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक आरती करीत. अशीच एके संध्याकाळी ला व मैत्रिणी आरत्या म्हणत असताना माझ्या मनात विचार आला की, या वेळ तात्या काय करतातहेत ते पाहू या. तात्या त्या वेळे आजारी असल्याने पडून असत. खोलीत डोकावले तो आश्चर्य वाटावे अशी घटना पाहावयास मिळाली. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वा पुस्तकवाचनात तात्या तल्लीन झालेले दिसले नाहीत. बाहेरच्या खोलीत चाललेल्या आरतीच्या तालावर टाळ्या वाजवीत तात्या आरती गुणगुणताना तल्लीन झालेले दिसले. मला अपेक्षेपेक्षा वेगळेच दृश्य पहावयास मिळाले. मी चकित झालो. वाटले, एरवी पूजाअर्चाना आदी धार्मिक विधी न पाळणारे तात्या आज आपल्याच जागी गाजावाजा न करत आरती म्हणण्यात तल्लीन झाले कसे? यामागे काय कारण असावे बरे? विजयदशमी, दसऱ्यासारख्या शुभदिन प्रथेनुसार विदुलास शाळेत घालण्यासाठी शुभारंभ साधण्याची इच्छा व्यक्त करणारे आणि धार्मिक विधींवर नसतानाही गणपतीची आरती गुणगुणताना गुंग झालेले तात्या! याच कारणमीमांसा काय असाववी? धार्मिक रुढींचा, रोतीरिवाजांचा व पारंपरिक संस्कारांचा समाजावर इष्ट परिणाम अणि अनिष्ट परिणाम काय होते याचा बारकाईने विचार करून जा पारंपरिक रूढींमुळे समाजाला सद्वर्तनाची, संघटितपणाची व विजोगिषूवृत्तीची शिकवण मिळते, अशा रूढी किंवा धार्मिक रीतिरिवाज पाळले जावेत, आणि ज्या चालीरीती किंवा धार्मिक विधींपासून समाजाला केवळ अंधश्रध्देने क्रियाकर्म करावयास लागते, प्रत्यक्ष उपकारकर्ता लाभत नाही, अशा कालबाह्य रूढींचा व विधींचा त्याग करावा असे त्यांचे ठाम मत होते. यासाठीच गुढीपाडव्याला ध्वजउभारणी, त्या दिवशी नवसंस्थांचे शुभारंभ करणे किंवा दसऱ्याला-विजयादशमीला संघटन साधण्याच्या हेतूने सोने लुटून एकमेकांना भेटणे, कालिमातेची पूजा, विजोगिषूवृत्ती जागृत राहावी म्हणून शस्त्रपूजा किंवा

सीमोल्लंघन आदी पारंपरिक धार्मिक विधीरूढींचा पुरस्कार ते करीत. मात्र होमहवनात तेलतूपाचे अर्घ्य, देवाच्या मूर्तींना दह्या-दुधाने घातली जाणारी आंघोळ किंवा पिंडाला शिवणारे कावळे, अशा अनेक दुधखुळ्या धार्मिक रूढींवर त्यांनी कडक टीका केली की, अर्घ्य म्हणून मणावरी फुकट जाणाऱ्या तेल, तूप, दुधातून शेकडो माणसे पोसली असती.

गुढीपाडव्याला किंवा विजयदशमीला घरोघर हिंदू ध्वज लावणे, सार्वजनिक समारंभयुक्त ध्वजारोहण करून हिंदू धर्माचा व हिंदू राष्ट्राचा जयजयकार करीत प्रभातफेऱ्या काढणे असे कार्यक्रम त्यांनी आखले होते. गणेशोत्सवाच्या काही धार्मिक रूढींचा तर त्यांनी हिंदुत्वजागृती व हिंदू संघटनेसाठी उपयोग करून घेतला होता हे सर्वश्रुत आहेतच. उपयुक्त रूढींचा तात्यांनी असा सदुपयोग केला.

चि. विदुलाला दसऱ्याच्या दिवसापासून शाळेत घालण्यामागे आणि तिने घरी आणलेल्या गणपतीच्या आरती म्हणण्यात भाग घेण्यामागे वरील तात्विक विवेचन कारणीभूत झाले असावे.


(आठवणी अंगाराच्या- विश्वास सावरकर, पृष्ठ- १०४, १०५)


 
 
 

Comments


bottom of page