हिंदुस्थानच्या सैन्यदलात कारकीर्द घडवा (सत्र पाचवे) 🚩
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 19
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 आयोजित
(सत्र: ५ वे हिंदुस्थानाच्या सैन्यदलात जाण्याची संधी...)
१५ ऑगस्ट २०२५ रोजी " हिंदुस्थानाच्या सैन्यदलात जाण्यासाठी मार्गदर्शन व्याख्यान" हा उपक्रम पार पडला.सदर उपक्रम विनामूल्य होता. डोंबिवली मधील २ ते ३ शाळांतील मुलांनी आणि मुलींनी मार्गदर्शन घेतले तसेच आलेल्या काही पालकांना पण निवृत्त मेजर श्री. विनय देगावकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निकटचे सहकारी भोसला मिलिटरी स्कूल'ची स्थापना केली असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे ज्यांनी सावरकरांचे सैनिकीकरण खरे पुढे नेवून भोसला मिलिटरी स्कूल स्थापन केले त्यांची प्रतिमा पुजन करण्यात आले.
अनेक पालकांच्या आणि मुलांच्या शंकाचे पण निरसन झाले. डोंबिवली शाखेच्या वतीने पालकांना, मुलांना हा उपक्रम सर्व शाळात आवर्जून राबवून घेण्यासाठी शाळा प्रशासनाला आग्रह करावा असे आवाहन करण्यात आले. सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम टिळक नगर विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात झाला. सर्वाना कार्यक्रम संपल्यावर चहा,अल्पोपहार पण देण्यात आला.









Comments