top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा डोंबिवली येथील गुढीपाडवानिमीत्त स्वागत यात्रेत सहभाग...🚩

🚩 #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था #डोंबिवली_शाखेतर्फे सावरकरप्रेमींनी या वर्षीच्या डोंबिवली मधील नववर्ष #गुढीपाडवा स्वागत यात्रेत सहभाग घेतला.

या शोभायात्रेत सर्व महिला आणि पुरुषांनी पांढर्‍या पोषाखात संस्थेचे शेले घालून सहभाग घेतला.चित्र रथावर पारंपरिक गुढी बरोबर स्वातंत्र्यवीरांनी तयार केलेला हिंदू ध्वज लावण्यात आला. तसेच चित्ररथावर काही लहान मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा पेहराव तसेच भारत मातेचा पण पेहराव केला होता. पूर्ण यात्रेत सावरकरांची अजरामर गीते ध्वनिक्षेपकावर चालु होती. रथामागे स्वातंत्र्यवीरांचे काही विचारांचे फलक घेवून संस्थेचे सदस्य सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत होते.

या शोभा यात्रेमधून संस्थेच्या सदस्यांनी

विज्ञाननिष्ठ सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर, देशरक्षक सावरकर, राष्ट्रकवी सावरकर आणि समाजसुधारक सावरकर या फलकातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला.

काही महिलांनी महत्त्वाच्या चौकात सावरकरांच्या गीतावर झेंडा नृत्य देखील केले.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩











 
 
 

コメント


bottom of page