स्व. यमुना विनायक सावरकर
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Nov 8, 2024
- 1 min read
स्व.यमुना विनायक सावरकर
माहेरचे नाव - यशोदा भाऊराव चिपळूणकर
टोपण नाव : माई
स्वातंत्र्यवीरांशी नाते : पत्नी
जीवन कार्यकाळ : ४ डिसेंबर १८८८ - ८ नोव्हेंबर १९६३
कार्य :
१) येसुवाहिनींबरोबर 'आत्मनिष्ठ युवती संघा'चे काम
२) रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत असतांना महिलांमध्ये सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आणि सहभोजने घडवून आणली.
३) क्रांतिकारकाची पत्नी म्हणून खडतर, कष्टमय जीवन जगत झडती आणि जप्तीला तोड देत पतिकार्यात स्वतःला झोकून दिलं.
४) मोठे दीर बाबरावांना जन्मठेप, पतीची वाटचालही त्याच मार्गावर, एकुलता एक पुत्र 'प्रभाकर' चा मृत्यू अशी जीवघेण्या संकटांची मालिका...... सत्वपरिक्षेचा काळ!! धीरोदात्तपणे तोंड दिले.
गुणविशेष :
🚩 ईश्वरावर अढळ श्रद्धा
🚩 पतिनिष्ठा
🚩 राष्ट्रनिष्ठा
🚩सोशिक
🚩सहनशील
🚩नम्र
तात्यांचा अमृतमहोत्सव, डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी लिट) पदवी निमित्त सत्कार असे सुखद क्षण आठवत रमा-माधव पुण्यतिथीच्या दिवशी कर्करोगाशी झगडत माईंची प्राणज्योत मालवली.

प्रस्तुत माहितीसाठी मार्गदर्शन : त्या तिघी या कादंबरीच्या लेखिका आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ.सौ.शुभा साठे
- श्रीनिवास कुलकर्णी (स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, संस्थापक अध्यक्ष)
Comments