शाळा-शाळांत सावरकर 🚩
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 20, 2022
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि
#डोंबिवली
#शाळा_शाळांत_सावरकर
स्वातंत्रवीर सामाजिक संस्था (अंनिविवि),डोंबिवली शाखा उपक्रम क्रमांक : ८
विद्यार्थीदशेपासून लहान मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर जास्तीत जास्त कळावेत, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा कळाव्यात म्हणून "स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,दादर येथे शाळकरी मुलांची शैक्षणिक सहल" या उपक्रमाची सुरूवात दिनांक १७.१२.२०२२ रोजी विद्या निकेतन शाळा,डोंबिवली पासून झाली.
डोंबिवली ते दादर लागणाऱ्या बस मधील वेळेचा सदुपयोग करून सर्वप्रथम डोंबिवली शहराध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे यांनी सहलीची माहिती, कार्यकारिणीची ओळख आणि संस्थेच्या उद्दिष्टाबाबत मुलांना माहिती दिली.
सौ. ऋजुता सावंत यांनी सावरकरांच्या आयुष्यावर आणि त्यातील काही घटनांवर माहिती दिली ज्यावर पुढे मुलांची एक प्रश्नमंजुषा घेतली आणि विजयी मुलांना सावरकरांची पुस्तके भेट दिली.
नंतर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित काही समूह खेळ सौ.किमया कोल्हे आणि डॉ.सौ.वृषाली राजवाडे यांनी घेतले, ज्याचा मुलांनी खूप आस्वाद घेतला. तसेच श्री मंगेश राजवाडे यांनी सावरकरांबाबत असलेल्या शंका, चुकीची माहिती याचे निरसन केले.
स्मारकात पोचल्यावर तिथे असलेले क्रांतिकारक चित्र शिल्पे, शूटिंग रेंज याची माहिती स्मारकातील अधिकार्यांनी दिली. तसेच मुलानी बेड्या घालून कोलु फिरवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या यातना कशा असतील हे समजून घेतले.
नंतर लाईट आणि साउंड शो याचा मुलांनी पहिला ज्याने ते भारावून गेले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साठवलेल्या पैशातून मुलांनी स्मारकात काही सावरकरांवर आधारित पुस्तके खरेदी केली.अल्पोपाहार करून सर्व परत निघाले.परतीच्या प्रवासात मुलांना स्वातंत्र्यवीरांच्या विचारांवर आधारित एक बुकमार्क भेट देण्यात आला.विद्या निकेतन शाळेचे प्राचार्य श्री. पंडित सर यांचे खूप धन्यवाद!
या सहलीचे बाकीचे सर्व नियोजन शहरउपाध्यक्ष अभिजित कापाशीकर,कार्याध्यक्ष दीपक देसाई व सरचिटणीस निशांत धावसे यांनी केले. अत्यंत महत्वपूर्ण आणि पुढील पिढीला घडवणारा उपक्रम संस्थेमार्फत अनेक शाळांतून हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
सावरकरांचे विचार आणी सावरकरांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना 🚩
- स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,
(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)🚩


















स्तुत्य उपक्रम.
खरोखरच अशा स्वातंत्र्यवीरांची त्याचे विचार आताच्या पिढीला पोचवण्याची नितांत गरज आहे आणि हा वसा आपल्या संस्थेने घेतला आहे व त्यासाठी प्रयत्नशिल आहात खूप कौतुकास्पद आहे.
जय हिंद ! जय सावरकर !