top of page

रविवार २८ मे सकाळी ९ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे होणार सावरकर जयंती सोहळा...🚩

*स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे येथे २८ मे रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार सावरकर जयंती उत्साहात होणार साजरी*

जय सावरकर 🚩

*रविवार २८ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत फर्ग्युसन महाविद्यालय* येथे सावरकर जयंती निमित्त संस्थेतर्फे काही महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत...त्याची माहिती तुम्हाला पाठवत आहे...

१) सकाळी : ९ वाजता

🔸सावरकरांचे वास्तव्य असलेली फर्ग्युसन महाविद्यालय येथील खोली येथे होणार

🔹 *स्वा.सावरकर लिखित शिवरायांची आरती अनावरण सोहळा आणि शिवरायांची सामूहिक आरती* 🚩

२) सकाळी ९:३० वाजता

🔸फर्ग्युसन महाविद्यालयातील कुंदनमल फिरोदिया सभागृह येथे होणार...🚩

🔹 *छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीवर नृत्य सादरीकरण* 🚩

🔹 *लेखिका आणि संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ.सौ.शुभा साठे यांचे "महाविद्यालयीन सावरकर"* 🚩 या विषयावर व्याख्यान

🔹संस्थेचे सदस्य व लेखक श्री.हेमंत सांबरे लिखित *सावकर समजून घेताना* या पुस्तकाचे प्रकाशन 🚩

कार्यक्रमाचे अध्यक्ष :

*श्री.धीरज घाटे (मा.सभागृह नेते)*

प्रमुख पाहुणे :

*श्री.प्रदीप रावत ( माजी खासदार)*

प्रमुख उपस्थिती :

*श्री.सात्यकी सावरकर (सावरकरांचे नातू)*

आणि

*श्री.अक्षय जोग (लेखक आणि वक्ते)*

तरी आपण पुण्यात असल्यास या कार्यक्रमास सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित रहावे अथवा आपल्या पुण्यातील सावरकर प्रेमींपर्यंत हा निरोप पोहोचवून सहकार्य करावे ही नम्र विनंती 🙏🏻

तर मग अशा प्रकारे सावरकर जयंतीच्या दिवसाची सुरुवात अगदी उत्साहात करू...🚩✌🏻

रीतसर निमंत्रण पत्रिका लवकरच पाठवली जाईल...

धन्यवाद 🙏🏻

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

श्रीनिवास कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष)

9561491625


 
 
 

Comments


bottom of page