top of page

महिला दिनानिमित्त डोंबिवली येथे महिलांचा सन्मान...

🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 (अंधश्रद्धा निवारण आणि विज्ञानवादी विचारप्रणाली) या आपल्या संस्थेच्या डोंबिवली शाखेने जागतिक महिला दिन सप्ताह निमित्तानं "महिला दिवस" यशस्वी रित्या पार पाडला. कार्यक्रमात महिलांनी व्यक्तिगत "कला सादरीकरण" तसेच "सांघिक खेळ" पण खेळले. विजेत्या "महिलांना बक्षीस" देण्यात आले, उपविजेत्या महिलांना "पैठणी जॅकेट" तसेच महाविजेत्या महिलेला "पैठणी भेट देण्यात आली." कार्यक्रमात शाखेने डोंबिवली मधील 4 महिलांचा सत्कार केला. ज्यांची नावे

1) सौ. अंजली बापट

2) गणपती मंदिर संस्थान विद्यमान अध्यक्ष सौ. अलका ताई मुतालिक

3) डॉ. सौ. वृषाली दाबके

4) विधिज्ञ सौ. शिल्पा भागवत

या चारही महिलांचे समाज आणि कला क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे जे या छोट्या पोस्ट मध्ये लिहणे खूप कठीण आहे. चारही महिलांचा सत्कार सावरकरांची प्रतिमा, आपल्या संस्थेच्या मार्गदर्शिका सौ.शुभा साठे लिखित त्या तिघी पुस्तक आणि अनोखा नॅपकीन गुच्छ देवून केला. कार्यक्रमाची काही छायाचित्रे देत आहे. तसेच काही महिलांचा अभिप्राय पण देत आहे.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

सावरकरांचे विचार आणी सावरकरांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना 🚩

- स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,

(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)🚩


 
 
 

Comentários


bottom of page