top of page

भारतीय सैन्य दलांमध्ये सेवा- शिक्षणानंतर करिअरचा एक उत्तम पर्याय यावर मार्गदर्शन वर्गाचे संपूर्ण महाराष्ट्रातून शाळा शाळात सुरुवात..."

🚩स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे "भारतीय सैन्य दलांमध्ये सेवा- शिक्षणानंतर करिअरचा एक उत्तम पर्याय यावर मार्गदर्शन वर्गाचे संपूर्ण महाराष्ट्रातून शाळा शाळात सुरुवात..."


🇮🇳 क्रांती दिन व स्वातंत्र्यदिन 🇮🇳 सप्ताहाचे औचित्य साधून पिंपरी - चिंचवड शहरातून प्रारंभ


भारतीय सैन्य दलांमध्ये सेवा- शिक्षणानंतर करिअरचा एक उत्तम पर्याय, या विषयवार शिक्षण प्रसारक मंडळी, इंग्रजी माध्यम शाळा यमुनानगर येथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे इयत्ता नववी साठी संवाद सत्र आयोजित करण्यात आले.


"जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा" स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या काव्य पंक्तिचा अर्थ उलगडत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसमोर 🇮🇳

"निवृत्त मेजर अजित कुलकर्ण (स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, सावरकर साहित्य अभिवाचन प्रमुख)"🚩यांनी भारतीय सशस्त्र सेना दल - करियरचा एक उत्तम पर्याय हा विषय मांडला. या कार्यक्रमास संस्थेचे पिंपरी चिंचवड पदाधिकारी शुभम कातंगळे यांची देखील उपस्थिती होती.


आज आपला देश चारही बाजूंनी शत्रूंनी वेढला आहे. चीन, बांगलादेश, श्रीलंका अणि पाकिस्तान ह्या शेजारी राष्ट्रांकडून कायमचाच धोका आज अणि भविष्यात असणार आहे. अशा परिस्थितीत शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी असे धोरण चालणार नाही. आपल्या मायभूचे, आपल्या राष्ट्राचे रक्षण हे आपल्यालाच करावे लागेल अणि त्यासाठी भारतीय सेनेत सेवा करण्याचा किमान विचार तरी सुरू करावा असे आवाहन उपस्थित मुलामुलींना मेजर अजित कुलकर्णी यांनी केले.


भारतीय सैन्यात अधिकारी आणि इतर स्तरावर निवड होण्याचे कोणते मार्ग आहेत आणि त्यासाठी तयारी कशी करावी हे देखील सांगण्यात आले. संरक्षण सेवेबद्दल असणारे मुलांच्या मनातील प्रश्नांचे निरसन करत गैरसमज देखील दूर करण्यात आले. पुणे शहर अणि परिसरात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) खडकवासला, College of military इंजीनियरिंग दापोडी, armed forces medical college, ordinance factory तळेगाव अशी अनेक महत्त्वाची आस्थापना आहेत.

राष्ट्रीय स्तरावरही यांचे खूप महत्व आहे. असे असूनही पुण्यातील रहिवाशांना ह्याची माहिती नसते. एनडीए खडकवासला येथे प्रशिक्षण घेणार्‍या मुला मुलीं मध्ये महाराष्ट्रातील अणि प्रामुख्याने पुण्यातील संख्या अत्यल्प अशी आहे. ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या पुण्यनगरीतुन जास्तीत जास्त तरुणांनी भारतीय सेनेत सेवा केली पहिजे असे विचार मांडले.


हा उपक्रम संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.


 
 
 

Коментарі


bottom of page