top of page

नेरळ येथे पार पडला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची शाखा उदघाट्न सोहळा : 🚩

नेरळ येथे पार पडला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची शाखा उदघाट्न सोहळा : 🚩


नेरळ येथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या शाखेचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, सावरकर साहित्य अभ्यासक अक्षय जोग, अंबरनाथ शहर प्रमुख सौ. विदुला कुलकर्णी,समन्वयक सागर बर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


घरोघरी सावरकर या उपक्रमाअंतर्गत संस्थेतर्फे सहा वर्षेपासून दरवर्षी सावरकर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते तसेंच सावरकर यांचे साहित्य घराघरात पोचवण्याचे काम सुरु केले आहे.जिथे सावरकर यांचे वास्तव्य होते तेथील माहिती घेण्यासाठी सहलीचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते असे यावेळी श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.

लेखक, वक्ते अक्षय जोग यांनीही सावरकर यांनी सावरकरांवर होणाऱ्या आक्षेपाचे वास्तव उपस्थितांसमोर मांडले.

सावरकरांचे नातू श्री.सात्यकी सावरकर यांनीही सावरकरांच्या जीवनातील आतार्यंत न पोहोचलेली अनमोल माहीती उपस्थितांना दिली.

यां कार्यक्रमाचे सूत्र संचालन विदुला कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमात सावरकर साहित्य पोहोचवण्याचे काम सागर बर्वे यांनी पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेरळ चे सदस्य हरी काळे, योगेश साठे,दिपक मोरे यांनी परिश्रम घेतले.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


bottom of page