दत्तभक्त : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 7, 2022
- 1 min read
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
स्वातंत्र्यलढ्यासाठी झुंज देणारे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आराध्य दैवत श्रीदत्त महाराज होते. फडकेमहाराज आपल्या नित्य स्नानानंतर या आराध्य दैवताची यथासांग पूजा तसेच गुरुचरित्राचे पारायण केल्यावाचून अन्न नि पाणी ग्रहण करीत नव्हते.
कारकोळपुऱ्यातील नरसोबाच्या मंदिरात ते आपल्या घरासमोरील ओट्यावर बसून श्रीगुरुचरित्राचे पारायण करायचेत. त्यांच्याकडे असलेला दत्तात्रेय हा तीनमुखांचा नसून एकमुखी होता. त्या एकमुखी दत्ताचे ध्यान हे शांत नसून रौद्र स्वरूपातील होते. या एकमुखी दत्तभक्तीमुळेच क्रांतिवीर वासुदेव बळवंतांनी हाताच्या तळव्याच्या आकारातील एक चांदीचे संपुट तयार करून त्यात चांदीच्या पादुका तयार केल्या होत्या. त्या पादुकांवर ते नित्य अभिषेक करुन श्रीदत्ताच्या नामाचा पाच सहस्त्र जप करायचे.
गाणगापुरात असलेले श्रीदत्त मंदिर हे वासुदेव फडके यांचे आवडते दैवत होते. कारण क्रांतीच्या अखेरच्या काळात याच परिसरात त्यांचे वास्तव्य होते.
▫️छायाचित्र सौजन्य :-
१. मित्रवर्य योगेश काटे, नांदेड
२. मित्रवर्य हर्षल देव, विरार
▫️माहिती संकलन :- शिरीष पाठक, नासिक





Comments