तब्बल १२० वर्षांनी सावरकररचित आरतीचा फर्ग्युसन महाविद्यालयात सामुदायिकपणे गुंजला निनाद
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- May 31, 2023
- 1 min read
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) संस्थेतर्फे १४० व्या सावरकर जयंती निमित्त
एक अनोखा उपक्रम करण्यात आला.
फर्ग्युसन महाविद्यालय ज्या खोलीत सावरकरांचे वास्तव्य होते त्या परिसरात १२० वर्षापूर्वी सामूहिक शिवरायांची आरती सावरकरांनी सुरू केली होती.
सावरकररचित छत्रपती शिवरायांच्या आरतीच फलक संस्थेतर्फे खोलीत लावून तब्बल १२० वर्षांनी शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत
फर्ग्युसन महाविद्यालयात सामुदायिकपणे शिवरायांची आरती करण्यात आली...त्यानंतर तेथील फिरोदिया सभागृह येथे डॉ.शुभा साठे यांचे "महाविद्यालयीन सावरकर" या विषयावर जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले होते.संस्थेच्या पुणे शहरासाठी विक्रम दिवाण आणि विशाल कुलकर्णी यांची अनुक्रमे पुणे शहराध्यक्ष आणि शहर चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.






अप्रतिम 🙏🙏🙏