top of page

टिळक पुण्यतिथी उत्सव, पुणे येथील छायाचित्र

भारत हे मूलत: हिंदू राष्ट्र आहे हे सावरकरांप्रमाणे टिळकांनीही स्पष्टपणे सांगितले होते. ‘‘भारतवर्षांतील निरनिराळय़ा प्रांतांत निरनिराळे राजे राज्य करीत असत, परंतु धार्मिकदृष्टय़ा ते सर्व एक होते आणि तशा दृष्टीने पाहिले तर भारतवर्ष म्हणजे त्या वेळचे हिंदू राष्ट्र होते.’’ (टिळक विचार- लेखक भा. कृ. केळकर, पृष्ठ १६)

लोकमान्यांनी सावरकरांना या शिष्यवृत्तीसाठी शिफारसपत्र दिले व त्यामुळे सावरकर लंडनमध्ये जाऊ शकले. १९०८ मध्ये लोकमान्यांना सहा वर्षांची कठोर शिक्षा झाली व त्यांची रवानगी मंडाले येथे करण्यात आली. सावरकरांनी लंडनमधून ‘लोकमान्यांना काळय़ा पाण्याची शिक्षा’ हे बातमीपत्र छापून पाठवले व शिवाय कॅक्स्टन सभागृहात निषेध सभेचे आयोजन केले. १९२० मध्ये लोकमान्यांचे निधन झाले त्या वेळी सावरकर अंदमानमधील काळकोठडीत होते. सावरकरांनी त्या वेळी शोक व्यक्त करण्यासाठी तुरुंगातील केवळ बंदिवानांना नव्हे तर अंदमानमधील सर्व रहिवाशांना उपवास करण्याचे आवाहन केले.

माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकर लिहितात ‘लोकमान्यांच्या अत्यंत कृतज्ञ आणि अत्यंत निष्ठावंत अनुयायांहून मी कृतज्ञ आणि निष्ठावंत होतो आणि राहिलो. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लोकमान्यांचे सर्व राजकारण आणि उपदेश आचरण्याची पराकाष्ठा करून त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पुढच्या प्रत्यक्ष रणक्षेत्रात उतरण्याची हाव धरली; धाव घेतली! त्यांच्यापुढे धावून त्यांचे मनोगत, उद्दिष्ट (स्वराज्य) सिद्धीस नेण्यास झटलो. ते खड्गाची मूठ होते तर आम्ही क्रांतिकारक त्यांचे पाते होतो. पाते हे मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते. मूठ जेवढी भक्कम तेवढीच तलवार प्रभावी. मूठ वैचारिक बैठक तर पाते प्रत्यक्ष कृती- दोन्हीही महत्त्वाचे, दोन्हीही अभिन्न!


श्री. रवींद्र साठे यांच्या लोकसत्ता मधील एका लेखातला छोटासा भाग..

मधुरा कुलकर्णी

ree

 
 
 

Comments


bottom of page