top of page

गुढीपाडवा स्वागत यात्रा, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखा

"स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,डोंबिवली शाखेचे गुढीपाडवा स्वागत यात्रेतील हे तिसरे वर्ष...


नेहमीप्रमाणे अनोखा चित्ररथ होताच. चित्र रथावर अखंड भारताचे चित्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या पायातील तोडलेल्या सात बेड्यांचे चित्ररूप दाखविण्यात आले. अनेक सावरकर प्रेमीनच्या बरोबर काही बाल सावरकर पण होतेच. स्वा. सावरकर रचित कुंडलीनी कृपाणकित ध्वज चित्र रथावर फडकवला गेला तसेच स्वा. सावरकरांच्या वरील सर्व गाणी ध्वनीक्षेपकावर चालूच होती.


तसेच या वर्षी ओम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू ग्राहक नोंदणी अभियान पण डोंबिवली पासुन चालु झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सांख्यिक बळावर कायम अग्रेसर होतेच पण आता हिंदूंचे आर्थिक बळ पण वृद्धिंगत व्हावे म्हणून ओम प्रतिष्ठानच्या या चळवलीला आमचा कायम पाठिंबा असेल, तुम्ही सर्वानी पण दया तसेच आम्ही आवाहन करू इच्छितो की उद्योजक असाल तर ओम प्रमाणपत्र जरूर घ्या आणि एक हिंदू ग्राहक म्हणून पण नोंदणी करा. यात्रेतील अनोखा चित्ररथ आणि अनोखे व्यासपीठ या दोन्ही आघाडीवर केलेल्या यशस्वी आणि उत्तम नियोजनाबद्दल डोंबिवली शाखा आणि ओम प्रतिष्ठान सर्वांचे हार्दिक अभिनंदन










 
 
 

Opmerkingen


bottom of page