Reminder 1: सेल्युलर जेल अंदमान
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Sep 14, 2022
- 1 min read
जय सावरकर 🚩
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 संस्थेतर्फे
फेब्रुवारी महिन्यात अंदमान येथील सेल्युलर जेल येथे कोठडी मधे पादत्राणे घालणे व जेल परिसरात कमी कपड्यात येण्यास मनाई करणे बाबत निवेदन पत्र दिले होते...
गेल्या दोन महिन्यापासून मी अंदमान येथील संचालक यांच्या संपर्कात राहून या गोष्टी पूर्ण करणे बाबत त्यांना सांगत आहे...
आज संस्थेचे सदस्य उल्हासजी कुलकर्णी व सहकारी यांनी संस्थेतर्फे या बाबतीत दुसरे निवेदन पत्र दिले आहे...तेव्हा सेल्युलर जेल कमिटी सदस्यांनी फलक लावला असे सांगितले...पण अधिकृत अजून कळवले नाही त्यामुळे आपल्या संस्थेतर्फे आज दुसरे पत्र देण्यात आले आहे...
आता जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे हे दोन्ही विषय लावून धरून पूर्ण करून घेणारच आहोत...
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
श्रीनिवास कुलकर्णी
संस्थापक अध्यक्ष.








Comments